बेभान होऊन
काळाच्या प्रवाहात
वाहत जातो आपण !
अंतस्थळी पोचताच
शोधत राहतो
धावण्याचं कारण !
उगम आठवण्याचा प्रयास
तेव्हा ठरतो फोल…
गेलेल्या क्षणाक्षणाचे
मग आठवत राहते मोल…
कळते जेव्हा होती धाव
शून्याकडून शून्याकडे….
अन् व्यर्थ होता हव्यास
झेपावण्याचा क्षितीजापलीकडे…
अनंत सागरात तेव्हा आपण
करतो अस्तित्व अर्पण…
काळापुढे हतबल होऊन
शेवटचे समर्पण……
__दीपक पोरे
काळाच्या प्रवाहात
वाहत जातो आपण !
अंतस्थळी पोचताच
शोधत राहतो
धावण्याचं कारण !
उगम आठवण्याचा प्रयास
तेव्हा ठरतो फोल…
गेलेल्या क्षणाक्षणाचे
मग आठवत राहते मोल…
कळते जेव्हा होती धाव
शून्याकडून शून्याकडे….
अन् व्यर्थ होता हव्यास
झेपावण्याचा क्षितीजापलीकडे…
अनंत सागरात तेव्हा आपण
करतो अस्तित्व अर्पण…
काळापुढे हतबल होऊन
शेवटचे समर्पण……
__दीपक पोरे
No comments:
Write comments