Bagh Ughaduni Daar Lyrics | Movie Song Lyrics |
शोधुन शिणला जीव अता रे साद तुला ही पोचल का
दारो दारी हुडकलं भारी थांग तुझा कदी लागल का
शाममुरारी कुंजविहारी तो शिरीहारी भेटल का?वाट मला त्या गाभा-याची आज मला कुनी दावल का
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का...
तान्ह्या बाळाच्या हासे रं डोळ्यात तो
नाचे रंगुन संताच्या मेळ्यात जो
तुझ्या माझ्यात भेटेल सा-यात तो
शोध नाही कुठे या पसा-यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहतो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी
बाप झाला कधी जाहला माउली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग पावल का?
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का...
राहतो माउलीच्या जिव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवी विज जो त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवुनी लाट ये जो किना-यावरी
तोल सा-या जगाचाही तो सावरी
राहतो जो मनी या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावल का?
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का...
Movie: Bhartiya [2012]
Lyrics: Guru Thakur
Music: Ajay-Atul
Singer: Roop Kumar Rathod
Star Cast: Subodh Bhave, Jeetendra Joshi, Meeta Sawarkar, Makarand Anaspure
Director: Girish Mohite
No comments:
Write comments