Wednesday, 18 November 2015

नीज नीज माझ्या बाळा (neej neej majhya baala by Yashawant)


नीज नीज माझ्या बाळा,
करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या
आहे भगवंता!

अंगावर पांघरूण
ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर
ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे
डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा
बैसे जागत अजून

ज्याने मांडियला सारा
विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला,
तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी,
झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली
आईची लेकरे
नको जागू,
झोप आता,
पुरे झाली चिंता
काळजी जगाची साऱ्या
आहे भगवंता!

यशवंत दिनकर पेंढरकर

No comments:

Post a Comment