Thursday 4 October 2012

साद पावसाची आली

साद पावसाची आली, शहारली माती ||
भुई सवे आभाळाची, जुळे आज प्रीती || ध्रु ||
उठावले घन घन घोर, नील कंठ झाले मोर ||
पिसार्यात लाखो डोळे, गगन न्याहाळीती || १ || 
निळामधे हीरक जडती, तसे शुभ्र बगळे उडती ||
कोसळती धारा धारा, दिशा धुंद होती || २ ||

चिंब चिंब जांभुळ रानी, मेघ मंद्र घुमती गाणी ||
मुके भाव हृदया मधले, शब्द रूप होती || ३ ||

तृप्त शांत झाली धरणी, मधुस्म्रिते हिरव्या कुरणी ||
पुसट चुंबना सम ओल्या सरी येती जाती || ४ ||

गगन धरा झाली एक, मुक्त प्रीतिचा अभिषेक ||
एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती || ५ ||

_____ शांता शेळके

No comments:

Post a Comment