समईच्या शुभ्र कळ्या | Samaichya Shubhra Kalya
समईच्या शुभ्र कळ्या,
उमलवून लवते
केसातच फुललेली
जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी,
दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले
माझे माहेर बापुडे
साचणार्या आसवांना
पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे
विसराळू मुलखाची
थोडी फुले माळू नये,
डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला
शिवू शिवू ऊन गं ये
हासशील हास मला,
मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल,
चंद्र होणार का दुणा
_आरती प्रभू
Chintamani Tryambak Khanolkar
(8 March 1930 – 26 April 1976)
He writes all poems under name 'Arati Prabhu'.
समईच्या शुभ्र कळ्या,
उमलवून लवते
केसातच फुललेली
जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी,
दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले
माझे माहेर बापुडे
साचणार्या आसवांना
पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे
विसराळू मुलखाची
थोडी फुले माळू नये,
डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला
शिवू शिवू ऊन गं ये
हासशील हास मला,
मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल,
चंद्र होणार का दुणा
_आरती प्रभू
Chintamani Tryambak Khanolkar
(8 March 1930 – 26 April 1976)
He writes all poems under name 'Arati Prabhu'.
No comments:
Post a Comment