Wednesday, 23 March 2016

Hirawa Nisarg | Navra Maza Navsacha | Jagdish Khebudkar | Movie Lyrics | Marathi Kavita | हिरवा निसर्ग

Hirawa Nisarg | हिरवा निसर्ग
Movie: Navra Maza Navsacha
Lyrics: Jagdish Khebudkar | जगदीश खेबुडकर
Singer: Sonu Nigam | सोनू निगम

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

नवे पंख पसरा, उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रीतीने

नवे पंख पसरा, उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

नव्या संगितातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरुप व्हावे संगसाथीने

नवे पंख पसरा, उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे

_ जगदीश खेबुडकर

No comments:

Post a Comment