Pu La Deshpande - Purushottam Laxman Deshpande.
(Born: 8 November 1919, Died: 12 June 2000)
मी एकदा आळीत गेलो
मी एकदा आळीत गेलो
चाळ घेऊन बाहेर आलो,
तोंडात भरली सगळी चाळ
मी तर मुलाखाचा वाचाळ
कधी पायांत बांधतो चाळ
उगीच नाचतो सोडून ताळ,
वजन भारी उडते गाळण
पायांचीहि होते चाळण
गाळणे घेऊन गाळतो घाम
चाळणीमधून चाळतो दाम,
चाळीबाहेर दुकान माझे
विकतो तेथे हंसणे ताजे
‘खुदकन् हसू’ चे पैसे आठ
‘खो खो खो’ चे एकशे साठ,
हसवण्याचा करतो धंदा
कुणी निंदा - कुणी वंदा
कुणाकुणाला पडतो पेच
ह्याला कां नाही लागत ठेच?
हा लेकाचा शहाणा की खुळा?
मग मी मारतो मलाच डोळा
_ पु. ल. देशपांडे [By Pu La Deshpande]
No comments:
Post a Comment