Tuesday, 8 September 2015

अस्वस्थ (Aswasth)

माझ्यातुन मी मला वजा केले अन्
करताना ते कळलेही नाही


जोडायाचे काही होते मजला पण
तुटताना मी तुटलेही नाही..


बाजार भरे तेथे केवळ अश्रूंचा
विकताना हे कळलेही नाही


दिशाच होती कुठे पावलांना या
प्रवासात ते सुचलेही नाही..


जगत राहिले अशीच सवयीने मी
जाणवले की जगलेही नाही,


उधळुन सारे मीच इथे सरलेली
सरताना मी उरलेही नाही..
_ स्पृहा जोशी

No comments:

Post a Comment