Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Ayushyavar Bolu Kahi
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare
दिसलीस वार्यामधे, आपुल्याच तोर्यामधे
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमधे.. वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
रणरण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या.. वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पांखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे ये न माझ्या घरट्यात नीज.. आता वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
वार्यावर उमटतो अलगद ठसा.. आता वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
खुळावले घर-दार, खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली आग अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्या विषाचीच माया.. आता वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उफराटी तर्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा.. आता वेड लागलं..
वेड लागलं.. मला वेड लागलं.. मला वेड लागलं..
_ संदीप खरे
No comments:
Post a Comment