Thursday, 11 June 2015

माझे मन तूझे झाले (Majhe Maan Tujhe Jhale)

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन॥

सुधीर मोघे

2 comments:

  1. मूळ मराठी मालिका स्वामी गायिका विभावरी आपटे
    अतिशय सुंदर शब्द आणि हृदयाला भिडणारे स्वर.
    अप्रतिम.

    ReplyDelete
  2. गायिका सुचित्रा बर्वे भागवत आहेत. विभावरी आपटे यांनी एका प्रोग्रॅम निमित्त फक्त गायले होते.

    ReplyDelete