राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया
दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने,कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराज, या झोपडीत माझ्या॥७॥
__संत तुकडोजी महाराज
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱया, त्यातुनी होती चोऱया
दारास नाही दोऱया, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने,कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहुन सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराज, या झोपडीत माझ्या॥७॥
__संत तुकडोजी महाराज
No comments:
Post a Comment