कविता म्हणजे काय?
कविता म्हणजे,मनातल्या भावना...
दुःखाच्या वेदना,आनंदाचे शब्द...
अन,सातत येणारी कोणाची तरी आठवण..
कविता म्हणजे,मित्रान बरोबरची मस्ती..
लहान बहिणीच प्रेम,आजी आजोबांचा आशीर्वाद..
अन,तो आई बाबांचा ओरडा
कविता म्हणजे,माझ्या आयुष्यात असणारी ती...
तिझं ते गोड हसणं,ते लहान मुलीसारखं वागणं...
मी तिला जवळ घेतास,नाजूक फुलासारखं ते तिझं लाजणं...
अन, ते माझं तिझ्यावर जिवापार प्रेम करणं...
कविता म्हणजे, आता माझी नसणारी ती..
सतत येणारी तिझी आठवण,माझे पाणावलेले डोळे...
अन, हृदयात तून येणारे फक्त एकच नाव...
कविता म्हणजे, हे विश्व...
कविता म्हणजे, तो परमेश्वर...
कविता म्हणजे, माझं घर...
कविता म्हणजे, माझे विचार..
अन, माझ्या विचारातली ती ...
कविता म्हणजे...
सोप्या शब्दात सांगायचं म्हंटल तर,
माझ्या विचारांना लाभलेली तुमची सात....
__ह्रषिकेश व्हटकर
No comments:
Post a Comment