Saturday 25 August 2012

नदी सागरा मिळता (Nadi Sagara Milata by Ga Di Madgulkar)

नदी सागरा मिळता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

काय सांगू रे बापारे, तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले

सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी, रुप वाफ़ेचे घेऊन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लेऊन

पुन्हा होऊन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.

__ग. दि. माडगूळकर

No comments:

Post a Comment